डॉ. राम पुनियानी - लेख सूची

इस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण

 इस्लामच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून जगाने हिंसा आणि दहशतवादाच्या असंख्य घटना झेलल्या आहेत. यातील अनेक इतक्या क्रूर आणि माथेफिरूपणाच्या आहेत की, ना त्या विसरल्या जाऊ शकतात, ना त्यांना माफ करता येते. ओसामा-बिन-लादेनने योग्य ठरविलेल्या 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधी व्यक्तींचे मृत्यू, पेशावरमधील शालेय मुलांवरील हल्ला, बोकोहरमद्वारे केलेले शाळेतील मुलांचे अपहरण, चार्ली हेब्दोवरील हल्ला आणि आयसिसद्वारे केल्या …

सूफी परंपरा

वर्तमान काळात धार्मिक समूहभानाचा उपयोग राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी केला जात आहे. मग मुद्दा दहशतवादी हिंसेचा असो वा संकीर्ण राष्ट्रवादाचा, जगाच्या सर्व भागांमध्ये धर्माच्या मुखवट्यांआडून राजकारण केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याच्या, ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात होता. पण आता अगदी उलट झाले आहे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ वाढतच गेली. या संदर्भात दक्षिण …